लाहोर
: बंदिस्त स्टेडियममध्ये प्रेक्षकविना क्रिकेट सामने भरविण्याच्या कल्पनेला पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने नापसंती दर्शविली. प्रेक्षकाशिवाय खेळणे म्हणजे वधूशिवाय विवाह करण्याचा प्रकार असल्याचे त्याने म्हटले आहे.कोव्हिड-19 महामारीमुळे जागतिक स्तरावरील सर्व प्रमुख क्रीडास्पर्धा लांबणीवर किंवा रद्द करण्यात आल्या आहेत.
प्रेक्षकांसह भरगच्च स्टेडियममध्ये क्रिकेट सामन्यांचा आनंद मोकळय़ा आणि बंदिस्त स्टेडियममध्ये उपभोगता येणार नाही, असे मत यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने देखील व्यक्त केले होते.