गोडोली / प्रतिनिधी :
महाराष्ट्रातील नवोदित कलाकारांना समाजाने आपला सुपूत्र म्हणून पाठिंबा दिला पाहिजे. शेखर डोंगळे हा एक गुणी कलाकार असून, त्याचा ‘प्रेमग्रंथ’ हा अप्रतिम अल्बम असून, नक्कीच तो सर्वांना आवडेल, असे गौरवोद्गार खा.छ.उदयनराजे भोसले यांनी काढले.
मुळचे कोल्हापूर येथील असलेले संगीतकार, अभिनेते, गायक शेखर डोंगळे यांच्या ‘प्रेमग्रंथ’ या अल्बमचे अनावरण खा.छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते जलमंदिर पॅलेस येथे मोठ्या उत्साहात पार पाडला. यावेळी कॅमेरामन दत्ता अडके, गायिका मंगल सुपेकर, सांगली जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते विजयभाऊ जाधव, सुमन डोंगळे यांच्या सह सिनेक्षेत्रातील काही मान्यवर उपस्थित होते.