प्रतिनिधी / मिरज
प्रेम प्रकरणातून तिघांनी मंगल टॉकीजजवळील अमीर दस्तगीर मुजावर या तरुणाच्या घरात घुसून त्याच्या आई-वडीलांवर आणि बहिणीवर कोयत्याने हल्ला केला. मंगळवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी नागेश दत्ता माने, नुरमहंमद शेख, सिकंदर बादशा सय्यद (सर्व रा. कैकाडी गल्ली, हिंदू धर्म शाळेजवळ) यांच्यावर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.