बेंगळूर
बेंगळुरात बांधकाम क्षेत्रात कार्यरत असणारी पेस्टीज इस्टेटस् लवकरच एका प्रकल्पाच्या विकासासाठी आणखी एक विकासक कंपनी सेंच्युरी रिअल इस्टेटसोबत करार करणार असल्याचे सांगितले जाते. यासंबंधातील बोलणी अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार बेंगळुरात संयुक्तपणे 16 एकर जागेत एक प्रकल्प विकसित केला जाणार असल्याचे समजते. हेब्बाळ भागात असणाऱया या प्लॉटची किंमत 600 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.