मुंबई
बांधकाम क्षेत्रातील कंपनी प्रेस्टीज इस्टेट यांचे 3 नवे प्रकल्प मुंबईत साकारले जाणार आहेत. घरांच्या मागणीत झालेली वाढ पाहून कंपनीने 3 नवे प्रकल्प तेही रहिवासी गटात उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात 15 दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळात नवे प्रकल्प उभारले जातील, असेही कंपनीने म्हटले आहे. मार्च 2022 पर्यंत घर बुकिंगच्या माध्यमातून 60 अब्ज रुपये प्राप्त करण्याचे ध्येय कंपनीने समोर ठेवले आहे.