वृत्तसंस्था/ मुंबई
2021 प्रो कब्बडी लीग हंगामाला बेंगळूरमध्ये 21 डिसेंबरपासून प्रारंभ होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. आठव्या प्रो कब्बडी लीग स्पर्धेसाठी प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी मिळणार आहे.
या स्पर्धेसाठी कब्बडीपटूंच्या लिलावाचा कार्यक्रम 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान मुंबईत मार्शल स्पोर्टस्ने आयोजित केला होता. कर्नाटकामध्ये कब्बडी या क्रीडाप्रकाराला शौकिनांचा प्रतिसाद प्रचंड प्रमाणात मिळत असल्याने कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या लीग स्पर्धेचे खास स्वागत केले आहे. या स्पर्धेवेळी कर्नाटक शासनाकडून सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून कोरोना संदर्भातील नियमांची अंमलबजावणी केली जाईल.