ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्लाझ्मा थेरपीद्वारे रुग्णांवर उपचार करण्यात येईल, अशी ऐतिहासिक घोषणा केली आहे. अमेरिकेच्या फूड अँन्ड ड्रग्ज विभागानेही इमर्जन्सी केसमधील कोरोनाबाधिताच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यास परवानगी दिली आहे.
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचे प्लाझ्मा घेऊन ते कोरोना रूग्णांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे गंभीर अवस्थेतील कोरोना रुग्ण बरे होण्यास मदत होईल. तसेच यामुळे मृत्यूदरही 30 ते 50 टक्क्यांनी कमी होऊ शकतो.
कोरोना रुग्णवाढीच्या वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 58 लाख 74 हजार 146 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 31 लाख 67 हजार 063 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 लाख 80 हजार 604 जणांचा मृत्यू झाला आहे.