प्रतिनिधी / कोल्हापूर
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत प्लॅस्टिकचा वापर करणा-या 6 व्यापाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड करुन 30 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्लॅस्टिक व थर्माकॉल इत्यादीपासून तयार केलेले वस्तूंचा वापर, वितरण, साठवणूक, घाऊक, किरकोळ विक्री तसेच उत्पादन करणारे नागरिक व व्यावसायिक यांच्यावर महापालिकेच्यावतीने दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. याअंतर्गत बुधवारी महाद्वार रोड येथील युवराज फुटवेअर, क्रांती साडी सेंटर, महालक्ष्मी ड्रेस मटेरियल, गोकुळ मिल्क शॉपी, राधेश्याम साडी सेंटर व भवानी मंडप येथील अरिहंत कट पिस सेंटर यांच्यावर प्लास्टिक विरोधी पथकाने कारवाई करुन दंड वसूल करण्यात आला.
सदरची कारवाई प्रशासक डॉ.कादंबरी बलवकडे, उप-आयुक्त रविकांत आडसूळ व मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, आरोग्य निरीक्षक ऋषीकेश सरनाई, गीता लखन व कर्मचारी यांनी केली.