प्रतिनिधी/ कराड
वेस्ट टु वेल्थ हा नारा देत येथील नगरपालिकेने कचऱयातील टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती केली आहे. अशाच वस्तूंपासून हत्तीची प्रतिकृती बनवल्यानंतर आरोग्य विभागाने प्लास्टीक कचरा व ई कचऱयापासून माशाची प्रतिकृती साकारली आहे. ही प्रतिकृती पालिकेत ठेवण्यात आली असून ती पाहून नागरिक आरोग्य कर्मचाऱयांचे कौतुक करत आहेत.
स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सलग तिसऱया वर्षी देशात अव्वल येण्यासाठी पालिकेचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. घनकचरा व्यवस्थापन करताना टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करण्यात येत आहेत. शहरात रस्ते व गटर सफाई करताना सापडलेले प्लास्टीक चेंडू, बाटल्या, रबर, बांगडय़ा, बल्ब, रिमोट यासह घरोघरी संकलन होणाऱया कचऱयातून प्लास्टीक वस्तूपासून माशाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. मुख्याधिकारी रमाकांत डाके, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांच्यासह नोडल ऑफिसर रफीक भालदार, नोडल ऑफिसर मिलिंद शिंदे व पदाधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रतिकृती आरोग्य विभागातील कर्मचाऱयांनी साकारली आहे.
मुळातच कचऱयात बऱयाच वस्तू अशा असतात की, ज्याचा पुन्हा उपयोग करता येतो. मात्र नागरिक या वस्तू कचऱयात टाकतात. मात्र थोडे कष्ट घेतले तर यातून चांगल्या कलाकृती बनवता येतात, हा संदेश पालिकेने या प्रतिकृतीच्या माध्यमातून दिला आहे. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, गटनेते राजेंद्रसिंह यादव, सौरभ पाटील, विनायक पावसकर यांच्यासह नगरसेवक व नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱयांचे कौतुक केले आहे. आणखी काही कलाकृती बनवण्यात येत आहेत.