गेल्या अनेक दिवसांपासून टाळेबंदीच्या काळात घरी अडकल्यामुळे सगळे चित्रपट, वेबसिरीज, मालिका, विविध कार्यक्रम बघून झाले. परंतु, या गर्दीत मराठी चित्रपट, वेबसिरीज किंवा कोणत्याही प्रकारचा मराठी कंटेंट फार झळकला नाही. पुरेसा मराठी भाषेतील कंटेंट कोणत्याच ओटीटी माध्यमावर उपलब्ध नसल्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सुरु पाहायला मिळाला. अनेक प्रेक्षकांनी त्यांची ही भावना विविध सोशल मीडिया मंचावर व्यक्त करायला सुरुवात केली. त्यामुळे मराठी प्रेक्षकांच्या अविरत मनोरंजनासाठी ’प्लॅनेट मराठी‘ने प्लॅनेट मराठी ओटीटी या नव्याकोऱया खास मराठी ओटीटी माध्यमाची घोषणा केली.
आता त्यासाठी 10 नव्या कोऱया वेब सिरीज आणि सुमारे 850 तासांचे लहान मुलांसाठीचे कन्टेन्ट बनविण्यासाठी प्लॅनेट मराठीने कंबर कसली आहे. दिग्गज दिग्दर्शक आणि कलाकारांना घेऊन या 10 वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लहान मुलांसाठीचे नाविन्यपूर्ण आणि मनोरंजनाने भरपूर असं कंटेंट देखील निर्मितीच्या तयारीत आहे. येत्या नजीकच्या काळात नवीन मराठी वेब फिल्म्स, लघुपटांच्याही घोषणा करण्यात येतील. प्लॅनेट मराठीचे सर्वेसर्वा निर्माते अक्षय बर्दापूरकर, अभिनेते पुष्कर श्रोत्री आणि संगीत- संयोजक आदित्य ओक यांच्या दूरदृष्टीतून साकार होत असलेल्या या मराठमोळ्या ओटीटी माध्यमाची मराठी मनोरंजनसफष्टीत चर्चा रंगू लागली आहे. म मानाचा, म मराठीचा म्हणत दणक्यात प्लॅनेट मराठीने प्रेक्षकांची मनं जिंकायला सुरुवात केली आहे. येत्या डिसेंबर 2020 पासून प्रेक्षकांसाठी खुल्या होणाऱया प्लॅनेट मराठी ओटीटीवर उपलब्ध केल्या जाणाऱया कंटेंटमुळे प्रेक्षकवर्ग नक्की सुखावेल अशी खात्री प्लॅनेट मराठी ओटीटीचे सीएम डी अक्षय बर्दापूरकर व्यक्त करतात.
प्लॅनेट मराठीची पहिली निर्मिती असलेला आणि प्रदर्शित झालेला एबी आणि सीडी चित्रपट, लवकरच येणारा शंतनू रोडे दिग्दर्शित अभिनेत्री सायली संजीवची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला गोष्ट एका पैठणीची हा चित्रपट तसेच प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी हा आगामी चित्रपट अशा अनेक प्रोजेक्ट्सचा चित्रपटाच्या निर्मिती पासून ते प्रदर्शनापर्यंतचा अनुभव अक्षय बर्दापूरकर यांच्या गाठीशी आहे. आणि त्यामुळेच भविष्यात चित्रपटमाध्यमाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता सिनेमा रिलीजच्या आव्हात्मक वाटणाऱया प्रवासाला एक पर्याय म्हणून निर्माते डिजिटल थिएटरचा मार्ग अवलंबवू शकतात असे ते म्हणाले.