प्लॅनेट मराठीची पहिलीवहिली निर्मिती असलेला ‘एबी आणि सीडी’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अगदी दुसऱयाच दिवसापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून चित्रपट आणि नाटय़गफह बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे एबी आणि सीडी बरोबरीनेच इतर अनेक चित्रपटांचं बॉक्स ऑफिसवरील आर्थिक गणित कोलमडले. पण, त्यामुळे डगमगून न जाता निर्माता अक्षय बर्दापूरकर आणि संपूर्ण टीमने हा चित्रपट ऍमेझॉन प्राइमवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आणि लोकांनी हा चित्रपट उचलून धरला.
आता ‘एबी आणि सीडी’च्या भरघोस यशानंतर प्लॅनेट मराठी सहा नव्या कोऱया चित्रपट आणि वेबसिरीजची निर्मिती करणार आहे. प्लॅनेट मराठीचा सर्वेसर्वा आणि निर्माता अक्षय बर्दापूरकर याने नुकतीच ही घोषणा केली आहे. शांतनू रोडे दिग्दर्शित ‘गोष्ट एका पैठणीची’ आणि प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ हे आगामी काळातील त्यांचे दोन महत्त्वाचे चित्रपट आहेत. चित्रपटाच्या यश- अपयशाबरोबरीने रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहणे हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे कोणत्याही संकटापुढे खचून न जाता त्याचा धैर्याने सामना करत येणाऱया भविष्याला सामोरं जाण्याची तयारी प्रत्येकाने ठेवायला हवी आणि म्हणूनच अक्षय बर्दापूरकर यांनी या अटीतटीच्या काळातही हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आपण जर फिल्म इंडस्ट्री म्हणतो तर त्यातून सतत निर्मिती होणं अत्यावशक असल्याचंही ते आवर्जून सांगतात. शिवाय, सिनेमाचे दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ आणि पडद्यामागील सगळय़ांना येत्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करायला लागू नये म्हणून हा निर्णय त्या प्रत्येकासाठी मोलाचा ठरणारा आहे.
प्लॅनेट मराठी नेहमीच मराठी सिनेमा आणि कलाकार कोणत्याही बाबतीत मागे पडू नये म्हणून सतत प्रयत्नशील असतो. आता प्लॅनेट मराठीच्या या भविष्यातील विविध प्रोजेक्ट्समध्ये प्लॅनेट टॅलेंटमधील कलाकारांसोबतच नव्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक नवीन कलाकारांना संधी देणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली. शिवाय वैविध्यपूर्ण अशा या अनेक चित्रपटांमध्ये बॉलीवूडच्या बडय़ा कलाकारांच्यादेखील भूमिका असणार आहेत. आता या सिनेमा आणि वेबसिरीजमध्ये कोण कलाकार असतील? त्यांचे दिग्दर्शक कोण असतील? आणि बॉलीवूडचे कोणते चेहरे यात झळकतील ही माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे. मराठी सिनेसृष्टीमध्ये सुसूत्रता आणून कोणत्याही बाबतीत आपण कोलमडून न जाता त्यावर मात करण्याची गरज आहे. म्हणूनच, येत्या काळात प्लॅनेट मराठी सहा नवे कोरे सिनेमे आणि वेब सिरीज घेऊन येणार आहे. शिवाय, अनेक आर्थिक गणितं स्थिर राखण्याच्यादृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे, असे निर्माता अक्षय बर्दापूरकर यांनी सांगितले.