क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
गुजरातात झालेल्या पश्चिम विभाग मुलांच्या आणि मुलींच्या सब-ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धेत गोव्याच्या बॉक्सर्सनी सहा पदके मिळविली. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना गोव्याने एक सुवर्ण, चार रौप्य आणि एक कास्य पदक प्राप्त केले. गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र अशा तीन राज्यातील खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते.
गोव्याच्या रौनक निंबारियाला महाराष्ट्रच्या बॉक्सर्सविरूद्ध 46-49 किलोगटात एक गुणानी ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. अथर्व चौधरीने 61-64 किलोगटात महाराष्ट्रच्या खेळाडूला हरवून सुवर्णपदक प्राप्त पेले. गोव्याला हेमंत हळळीने 43-46 किलोगटात, केतन वाळकेने 37-40 किलोगटात, सौरभ हस्बेने 67-70 किलोगटात तर साहिल सिंगला 40-43 किलोगटात अंतिम लढतीत पराभूत झाल्याने रॉप्यपदकावर समाधान मानावे लागले. हेमंत, केतन, सौरभ हे महाराष्ट्रच्या तर साहिलला गुजरातच्या बॉक्सर्सकडून पराभूत झाले. गोव्याच्या संघाला चितंबरम नाईक, विश्वनाथ गोवेकर आणि संतोष बिरमोळे यांचे प्रशिक्षण लाभले.