हिंदू जनजागृतीतर्फे पोलीस उपायुक्तांना निवेदन : चिनी फटाक्यांवर बंदी घालण्याची मागाणी
प्रतिनिधी /बेळगाव
प्रदूषण निर्माण करणाऱया तसेच देवतांचा अनादर करणाऱया फटाक्मयांवर निर्बंध घालावेत, अशा मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीतर्फे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांना देण्यात आले.
बुधवारी सकाळी दिलेल्या या निवेदनात समितीने म्हटले आहे, की फटाक्मयांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होते. आजवर फटाक्मयांमुळे अनेक दुर्घटनाही घडल्या आहेत. सध्या कोरोनाची दुसरी लाट कमी होत आहे. परंतु, पुन्हा नवीन लाट येईल की काय? अशी भीती व्यक्त होत आहे. कोरोना प्रामुख्याने श्वसन यंत्रणेवर आघात करतो. त्यामुळे जनतेच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने सर्वप्रकारच्या फटाक्मयांवर बंदी घालणेच हितावह ठरेल.
आजपर्यंत फटाक्मयांच्या पाकिटांवर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा लावल्या जात होत्या. परंतु, फटाके फोडताना वरचे आवरण कचऱयात पडून राष्ट्रपुरुषांचा अनादर होत होता. यामुळे समितीने सरकारशी पत्रव्यवहार करून काही प्रमाणात त्यावर नियंत्रण आणले. मात्र, आता राष्ट्रपुरुषांच्याबरोबरच हिंदू देवदेवतांची चित्रेही असतात. यामुळे देवदेवतांचा अनादर होत असून हिंदूंच्या भावना दुखावल्या जातात. समितीने 2005 पासून याबाबत जनजागृती करून फटाक्मयांच्या आवरणावर हिंदू देवदेवतांची आणि राष्ट्रपुरुषांची चित्रे छापू नयेत, यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा केला. परंतु, अद्याप त्याची कार्यवाही होत नाही.
भारतीय घटनेच्या कलम 25 अ नुसार प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे. परंतु, त्याचे रक्षण करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. व्यापारी उत्पादनांवर धार्मिक चिन्ह छापणे हा गुन्हा आहे, असेही समितीने नमूद केले आहे. त्यामुळे अशा फटाक्मयांवर आणि चिनी बनावटीच्या फटाक्मयांवर निर्बंध घालावेत, अशी मागणी केली आहे. यावेळी सुधीर हेरेकर, उज्ज्वला गावडे व सदानंद मासेकर यांनी हे निवेदन दिले.