ऑनलाईन टीम / मुंबई :
विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा भाजप-मनसे युतीच्या चर्चांना उधाण आले आहे.
देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहचले तेव्हा त्यांच्यासोबत पत्नी अमृता यादेखील उपस्थित होत्या. मात्र, ही बैठक राजकीय आहे की कौटुंबीक याबाबत मात्र अद्याप माहिती समोर आली नाहीये. देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे यांच्यात राजकीय विषयांवरही चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
शिवसेनेनं साथ सोडल्यानंतर भाजप नव्या मित्रपक्षासोबत युती करण्यास उत्सुक आहे. भाजपा आणि मनसे युती होऊ शकते, अशी चर्चा बऱयाच दिवसांपासून सुरु आहे. या युतीचा पहिला प्रयोग मुंबई महापालिका निवडणुकीत होण्याची शक्मयताही वर्तवण्यात येत आहे. काहीवेळापूर्वीच भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यानंतर देवेंद्र हे थेट राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचल्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.