ओटवणे/ प्रतिनिधी-
अतिदुर्गमस्थानी असलेल्या फणसवडे गावात दाणोली आरोग्य उपकेंद्रा मार्फत कोव्हॅक्सिन लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला.
यासाठी सावंतवाडी भाजपा तालुका अध्यक्ष तथा या भागाचे पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी पुढाकार घेतला.
या लसीकरणाचा महिला व पुरुष मिळून एकूण ७५ लोकांना डोस देण्यात आला. वाहतुकीचे कोणतेही साधन उपलब्ध नसलेल्या या गावात कोरोना लसीकरणाची सोय झाल्याने फणसवडेवासियानी समाधान व्यक्त केले. यावेळी केसरी- फणसवडे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य, फणसवडे पोलीस पाटील, आरोग्य सेवक आणि सेविका, आशा, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.