संगमेश्वर / प्रतिनिधी
संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे वनेवाडी येथील भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रूग्णालयात मृत्यू झाला आहे. संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार संजीवनी शिवशंकर वने (वय ४८ वर्षे) रा फणसवणे वनेवाडी असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
संजीवनी हिचे मानसिक संतुलन बिघडले होते. तीने राहत्या घरी पडवीत दिनांक १६ रोजी रात्री 2. ३० वाजण्याच्या सुमारास अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतल्याचे फीर्यादीत नमुद करण्यात आले आहे. घरच्या मंडळींनी तत्काळ त्यांना उपचारासाठी प्राथमिक उपचारासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय नंतर जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना संजीवनी यांचा मृत्यू झाला. याबाबतची फीर्याद पती शिवशंकर बाळू वने यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आर. जे. पन्हाळे करत आहेत.