प्रतिनिधी / पर्वरी
म्हापसा-पणजी महामार्गावर पर्वरी येथे 22 एप्रिल रोजी रात्री 11.45 वा. सुमरास 23 वर्षीय पादचारी तरुणास ठोकरून वाहनासह फरारी झालेल्या वाहन चालकास ताब्यात घेण्यास पर्वरी पोलिसांना यश मिळाले.
प्राप्त माहितीनुसार केए-20-डी-4117 हा उडपी कर्नाटक येथील मासेवाहू ट्रक 22 एप्रिल रोजी रात्री म्हापसाहून पणजीकडे महामार्गावरून धावत होता. येथील हुंडाई शोरूम समोरील महामार्गावर समीर वसूर (23 रा. कोएळेवाडा आल्त पर्वरी) चालत जात असताना मागाहून येणाऱया ट्रकचालकाने ठोकरल. गंभीर जखमी अवस्थेत त्या तरूणला येथेच सोडून ट्रकचालक पळाला. थोडावेळ जखमी अवस्थेतील तरूण पडून राहिला. महामार्गावरून जाणाऱया वाहनचालकाच्या दृष्टीस अपघात घडल्याचे कळल्यानंतर अज्ञाताने पर्वरी पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर जखमीला उपचारासाठी इस्पितळात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले अशी माहिती पोलिसांनी दिली.
अज्ञाताला वाहनांने ठोकरून फरारी झाल्याने पोलिसांनी त्याचे सीसीटीव्हीच्या सहाय्याने तपास सुरू केला. ट्रकचालक कुमार देवदास (रा. उडपी कर्नाटक) यास ट्रकसह पर्वरी पोलीस स्थानकात हजेरी लावण्याची ताकीद दिली. त्यानुसार काल सोमवार 4 मे रोजी ट्रकचालक ट्रकासह गोव्यात दाखल होऊन हजेरी लावली. पोलिसांनी ट्रकचालक कुमार देवदास यास अटक केली आणि वाहन जप्त केले.
मयत सलीम वसूर हा तरूण बॉक्सर होता. त्याने बॉक्सीगमध्ये मेडल प्राप्त केले होते. परंतु अपघाताने त्याचे स्वप्न अर्धवट राहीले. निरीक्षक निनाद देऊकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ऍण्ड्रू व त्यांच्या पथकाने अथक प्रयत्नाने शोध लावल्याबद्दल त्याचे कौतुक होत आहे.