उत्तर प्रदेश पोलिस खात्यामध्ये अनेक चमत्कारीक गोष्टी नेहमी घडत असतात. अनेकदा त्या बाहेरही येतात. असाच एक प्रकार नुकताच उघड झाला आहे. एका महिलेचा पती पोलिस खात्यात कामाला आहे. पण गेली पाच वर्षे त्याच्याऐवजी या महिलेचा भाऊच कामावर जातो. ,वेतन या महिलेच्या पतीच्या नावाने जमा होते.
हा प्रकार मोरादाबाद जिल्हय़ातील ठाकुरद्वार येथील पोलीस स्थानकात घडलेला आहे. ही पूर्ण पाच वर्षे तो या स्थानकात काम करणाऱया कोणाच्याही लक्षात आला नाही. पाच वर्षे या माणसाने आपल्या मेहुण्याचा जागी खुशाल नोकरी केली. मेहुणा याच फरार झाला होता. तो फरार झाल्याची नोंद खरेतर पोलिसात झाली होती. पोलीस त्याचा शोधही घेत होते. पण त्याच्या जागी त्याचाच नातेवाईक काम करत आहे, ही बाब काही वरीष्ठ पोलीस अधिकाऱयांच्या लक्षात आली नाही. अर्थात अशा प्रकारची ही पहिली घटना नव्हे. पण पोलिसातही असे व्हावे, याचे साऱयांना आश्चर्य वाटत आहे. खऱया पोलिचाचे नाव अनिल कुमार असल्याचे सांगण्यात येते आणि त्याच्याजागी काम करणाऱयाचे नाव सुनिल असे आहे.