ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
फॉस्फेटिक आणि पोटॅशिक फर्टिलायझरसाठी अतिरिक्त 28 हजार 655 कोटी रुपयांच्या सब्सिडीची घोषणा मंगळवारी मोदी कॅबिनेटच्या बैठकीत करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळाच्या समितीने पोषक तत्त्वांवर आधारित सब्सिडीच्या (एनबीएस) नव्या दरांना मंजुरी दिली. हे दर ऑक्टोबर 2021 ते मार्च 2022 साठी लागू असतील. बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनानुसार, एनबीएस अंतर्गत प्रति किलो नायट्रोजन (एन) अनुदानाचे प्रमाण 18.789 रुपये, फॉस्फरस (पी) 45.323 रुपये, पोटाश (के) 10.116 रुपये आणि सल्फर (एस) 2.374 रुपये प्रति किलो असेल. याप्रमाणे सब्सिडीचा सरकारवर 28,602 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार असेल.
कॅबिनेटमध्ये सैनिक स्कूल सोसायटीच्या नावाने ऍप्लिकेटेड सैनिक स्कूल उघडण्याचाही निर्णय घेण्यात आला. तसेच स्वच्छ भारत मिशन (अर्बन)ला 2025-26 या आर्थिक वर्षापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वच्छ भारत मिशन 2.0 साठी 1 लाख 41 हजार 600 कोटी रुपयांचा फंड जारी करण्यात आला आहे. हा निधी पहिल्या टप्प्यातील निधीच्या तुलनेत 2.5 पटीने अधिक आहे. स्वच्छ भारत मिशन 2.0 अंतर्गत सरकारने भारताला पूर्णपणे उघडय़ावरील शौचमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.