अस्मिता मोहिते/ सातारा
अत्त्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणाऱया चित्रपट क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली. यामध्ये सातारा जिल्हय़ाचाही डंका वाजला आहे. कारण 68 व्या राष्ट्रीय पारितोषिकांमध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार फलटण येथील अनिश मंगेश गोसावी या कलाकाराला जाहीर झाला आहे. ‘टकटक’ या चित्रपटात ाrल अभिनयाबद्दल त्याला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
अभिनयाचे कोणतेही प्रशिक्षण न घेतलेल्या अनिशला पहिल्याच प्रयत्नालाही गवसनी गाठता आली असल्याने त्याचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे. अनिश हा याचे सर्वाधिक श्रेय हे चित्रपट दिग्दर्शक विशाल कुदळे व त्यांच्या टिमला देतो. ‘टकटक’ या चित्रपटाचे सर्व चित्रीकरण हे फलटण येथेच झाले आहे. या चित्रपटाला इंडिया बुक रेकॉर्ड आणि एशिया बुक रेकॉर्ड हे दोन रेकॉर्ड आधी नमूद झालेले आहेत. तसेच 19 व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये चित्रपटाला स्पेशल जुरी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तसेच 2020 मध्ये झालेल्या दुबई एक्स्पो या ठिकाणी सुद्धा भारत सरकार आणि राज्य सरकार यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी या चित्रपटाची निवड करण्यात आली होती.
या चित्रपटाची कथा साधारण अशा विशाल नावाच्या बालकलाकाराभोवती फिरणारी आहे. जो मुलगा साधारण 11 ते 12 वर्षांचा आहे. जो शाळेच्या वर्गात तीन दिवसांसाठी अडकून राहतो. या तीन दिवसांसाठी शाळेला सुट्टी असते. यामध्ये मुलाचा वर्गातून बाहेर पडण्याचा प्रवास तर आहेच, तसेच स्वतःपासून स्वतःपर्यंतचा प्रवास सुद्धा या चित्रपटांमध्ये दाखवण्यात आलेला आहे. या तीन दिवसात घडणाऱया रोमांचकारी घटना आपल्या अंगावरती काटा आणतात. तसेच नात्यांमधील गुंता भावनिक पातळीवरती आपल्या मनाला साद घालतो.
दिग्दर्शकांचा अनिशवर व स्वतःवर विश्वास
या संपुर्ण चित्रपटाची कथा ही एका निरागस अशा मुलाभोवती फिरणारी आहे, याकरीता दिग्दर्शकांना 10 ते 12 वर्षांचा निरागस दिसणारा मुलगा. अशा चित्रपटाच्या मुख्य कलाकारासाठीची गरज होती. त्यांनतर बऱयाच ठिकाणी भेटी घेतल्या, ऑडिशन्स घेतले आणि त्यांचा शोध अनिश गोसावी या मुलावर येऊन थांबला. चित्रपट हा कमी बजेटमध्ये असल्यामुळे चित्रपटाचा मुख्य कलाकार हा परफेक्ट असणं गरजेचं होतं. अनिशला तसा अभिनयाचा काहीच अनुभव नव्हता.
पण दिग्दर्शकांचा अनिशवर आणि त्यांच्या स्वतःवर फार विश्वास होता.
चित्रपटातील प्रवास अविस्मरणीय
चित्रपट बनविताना अनेक अडचणी आल्या, हळुहळु सगळी प्रक्रिया चालू असताना अचानक कोरोनाचे संकट आलं आणि पुन्हा आमच्या कामाला ब्रेक लागला. परंतु हळूहळू करत सन 2020 मध्ये हा चित्रपट पूर्ण केला. चित्रपट पूर्ण झाल्यावर मात्र चित्रपटातील प्रवास मात्र अविस्मरणीय आणि आश्चर्यकारक राहिला आहे. या चित्रपटाने आम्हाला सर्वांनाच कठीण परिस्थितीतून मार्ग काढायला आणि स्वतः वर प्रेम करायला शिकवलं. आज या चित्रपटाला जे काही प्रेम मिळतंय त्यासाठी आम्ही ऋणी आहोत.
विशाल कुदळे
चित्रपट दिग्दर्शक