स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : 4 लाखाचा मुद्देमाल हस्तगत
प्रतिनिधी/ सातारा
मार्च महिन्यात फलटण शहरात चोरी करुन 2 लाख 46 हजार रुपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरणारे दोन चोरटे सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहेत. या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून 2 लाख 46 हजारांच्या दागिन्यांसह टाटा टेम्पो, मोबाईलसह एकूण 4 लाख 11 हजार 190 रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. फलटण शहरात बारामती रस्त्यावर दोन्ही चोरटय़ांना मुद्देमालासह ताब्यात घेवून त्यांना फलटण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सहाय्यक पोलीस आनंदसिंग साबळे, पोलीस उपनिरीक्षक, प्रसन्न जहाड सहा. पोलीस फौजदार ज्योतीराम बर्गे, उत्तम दबडे, पोहवा सुधीर बनकर, मुबीन मुलाणी, विनोद गायकवाड, पोना शरद बेबले, मोहन नाचन, संतोष जाधव, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, पो.कॉ. विक्रम पिसाळ, वैभव सावंत, केतन शिंदे, अनिल खटावकर, चालक संजय जाधव, विजय सावंत, मपोकॉ विद्या पवार, तनुजा शेख, तसेच फलटण शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विशाल भंडारी, पोलीस नाईक नितीन भोसले यांनी सहभाग घेतला होता.