सातारा/प्रतिनिधी
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे पुणे जेल मधून सातारा जेलमध्ये प्रवास करुन आलेले २ कैदी (वय वर्षे ३१ व ५८) व उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे बाधित रुग्णाचे निकट सहवासित १ (वय वर्षे ६) असे एकूण 3 नागरिकांचा कोरोना (कोविड – १९) अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते कोरोना बाधित असल्याची माहिती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले असल्याची माहिती अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. २ १३ ५६ १६ १९
तर क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 40, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील १६ अशा ५६ नागरिकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे. आता सातारा जिल्ह्यात ६६रुग्ण कोरोना बाधित असून आतापर्यंत ९ (कोविड -१९) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर २ जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण ७७ बाधित रुग्ण आढळले आहेत.