जिल्हय़ात पुढील तीन वर्षांसाठी राबविणार : आंबा, काजूसह केळी पिकाचाही समावेश : सर्व 39 मंडळांच्या नोंदी समाविष्ट
दत्तप्रसाद वालावलकर / ओरोस:
आंबा, काजू आणि केळी पिकांसाठीची प्रधानमंत्री फळपिक विमा योजना आता कर्जदार शेतकऱयांसाठीही ऐsच्छिक करण्यात आली आहे. तसेच भारतीय कृषी विमा कंपनीऐवजी आता ही योजना एच. डी. एफ. सी. अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत पुढील तीन वर्षे सिंधुदुर्ग जिल्हय़ात राबविली जाणार आहे.
सन 2020-21 ते सन 2022-23 या तीन वर्षांच्या कालावधीत ही योजना दरवर्षी राबविण्याचे निर्देश शासनाने 5 जून रोजी संमत केले आहेत. कमी जास्त पाऊस, सापेक्ष आर्द्रता, वेगाचे वारे, गारपीट यापासून होणाऱया नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱयांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राहावे, यासाठी आंबा, काजू व केळी या पिकांना विमा संरक्षण कक्षेत स्थान देण्यात आले आहे.
आंबा पिकासाठी हेक्टरी एकूण हप्ता 49 हजार रु.
आंबा पिकासाठी हेक्टरी एकूण हप्ता 49 हजार रुपये असून यातील 17,500 रुपये राज्य, तर 24,500 रुपये केंद्र शासनाकडून विमा कंपनीला दिले जाणार आहेत. तर सात हजार रुपये रक्कम शेतकऱयाला द्यावी लागणार आहे. या बदल्यात नुकसानग्रस्त शेतकऱयाला हेक्टरी 1 लाख 40 हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे. काजू पिकासाठी केंद्र व राज्य शासन प्रत्येकी 7 हजार 500 रुपये आणि लाभार्थी हिस्सा पाच हजार रु. असा एकूण 20 हजार हजार रुपये प्रति हेक्टरी विमा हप्ता निश्चित करण्यात आला आहे. नुकसान भरपाईपोटी प्रतिहेक्टरी एक लाख रुपये विमा संरक्षण दिले जाणार आहे. तर केळी पिकासाठी प्रति लाभार्थी केंद्र व राज्य सरकार प्रत्येकी 14 हजार रुपये विमा कंपनीला देणार असून सात हजार रुपये शेतकऱयाला द्यावे लागणार आहेत. एकूण विमा हप्ता 35 हजार रुपये असून केळी पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱयाला हेक्टरी एक लाख 40 हजार रुपये विमा संरक्षण दिले जाणार आहे.
आंबा, काजूसाठी सर्व महसूल मंडळांचा समावेश
दरम्यान गारपिटीच्या धोक्यापासून विमा संरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱया शेतकऱयांना प्रत्येक पिकासाठी जादा हप्ता भरावा लागणार आहे. त्यामुळे मिळणाऱया विमा संरक्षण रकमेतही वाढ होणार आहे. आंबा व काजू पिकासाठी जिल्हय़ातील सर्व 39 मंडळांचा समावेश करण्यात आला आहे. तर केळी पिकासाठी मात्र सावंतवाडी तालुक्यातील बांदा व मडुरा आणि दोडामार्ग तालुक्यातील तळकट व भेडशी या चारच महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.
स्वयंचलित हवामान यंत्रांच्या नोंदीनुसार लाभ
दरम्यान सन 2011-12 पासून सुरू झालेली ही योजना बिगर कर्जदार शेतकऱयांसाठी ऐच्छिक स्वरुपात ठेवण्यात आली होती. तर कर्जदार शेतकऱयांसाठी ती बंधनकारक होती. गतवर्षी 12 हजार 593 आंबा बागायदारांनी सहा कोटी चार लाखांचा विमा हप्ता भरून 9998.48 हेक्टर क्षेत्र संरक्षित केले आहे. तर 4 हजार 627 काजू बागायतदारांनी 1 कोटी 40 लाख रुपये विमा हप्ता भरून 3306.45 हेक्टर क्षेत्र संरक्षित केलं आहे. नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या केळी पिकासाठी दोन शेतकरी सहभागी झाले होते. स्वयंचलित हवामान यंत्रांच्या नोंदीनुसार यावर्षी त्याचा लाभ संबंधित शेतकऱयांना दिला जाणार आहे.
नुकसान भरपाईच्या रकमेची शेतकऱयांना प्रतीक्षा
दरम्यान सन 2018-19 या वर्षात आंब नुकसानीपोटी 34 कोटी 45 लाख 40 हजार रु., तर काजू नुकसानीपोटी चार कोटी 40 लाख एवढी रक्कम शेतकऱयांना मिळाली होती. मागील नऊ वर्षे कालावधीतील ही सर्वात मोठी नुकसान भरपाई होती. त्यामुळे या वर्षीच्या नुकसान भरपाई रकमेची शेतकऱयांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.
मागील नऊ वर्षांत कर्जदार शेतकऱयांचा मोठा समावेश
आतापर्यंत या योजनेत कर्जदार शेतकऱयांची संख्याच मोठी असल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी आंबा पिक योजनेत 12,593 शेतकरी सहभागी झाले होते. यामध्ये केवळ 756 शेतकरी हे बिगर कर्जदार होते. तर 11 हजार 837 कर्जदार शेतकऱयांचा समावेश होता. मागील नऊ वर्षांतील एकूण आकडेवारीतही कर्जदार शेतकऱयांचाच समावेश मोठय़ा प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे.
बँका अडचणीत येण्याची शक्यता
मात्र आता ही योजना ऐच्छिक असल्याने समाविष्ट व्हायचे किंवा नाही, याचा निर्णय शेतकऱयांच्या हातात राहणार आहे. त्यामुळे कर्जदार शेतकऱयाने विमा कवच न घेतल्यास आणि त्याला नुकसान झाल्यास बँकेचा हप्ता भरण्याबाबत त्याच्यासमोर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या नुकसानीबरोबरच कर्ज देणाऱया बँकांसमोरही वसुलीचा पेच राहणार आहे.
मागील नऊ वर्षांची कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱयांची आकडेवारी
सन आंबा शेतकरी बिगर काजू शेतकरी बिगर
कर्जदार कर्जदार एकूण कर्जदार कर्जदार एकूण
2011-12 650 41 691 00 00 00
2012-13 2161 138 2299 705 14 719
2013-14 2749 175 2924 00 00 00
2014-15 3580 228 3808 661 14 675
2015-16 3533 225 3758 1272 26 1298
2016-17 7199 460 7659 134 03 137
2017-18 6245 399 6644 1874 38 1912
2018-19 9349 597 9946 2148 44 2192
2019-20 11837 756 12593 4534 93 4627