रायबाग येथील घटना, हल्ल्यानंतर युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न
प्रतिनिधी/ बेळगाव
फळ विकणाऱया महिलेवर एका युवकाने ऍसिड हल्ला केला आहे. शुक्रवारी रात्री रायबाग येथे ही घटना घडली असून ऍसिड हल्ल्यानंतर त्या युवकाने विष पिऊन स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
ऍसिड हल्ल्यात 28 वषीय महिला जखमी झाली असून तिच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. रविवारी खासगी इस्पितळात हलविण्यात येणार आहे. ऍसिड हल्ल्यानंतर अण्णाप्पा सुभाष सेठ (वय 36) या युवकाने विष पिऊन आत्महत्याचा प्रयत्न केला असून त्याच्यावरही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
शुक्रवारी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. फळ विकत असणाऱया महिलेवर अण्णाप्पाने अचानक ऍसिड हल्ला केला. या घटनेनंतर घटनास्थळी विव्हळत पडलेल्या महिलेवर स्थानिक नागरिकांनी पाणी ओतून तिला स्थानिक इस्पितळात हलविले. रायबाग पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. अण्णाप्पा स्वतःहून पोलीस स्थानकात हजर झाला. ऍसिड हल्ल्यानंतर आपण विष प्याल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे त्यालाही सुरूवातीला स्थानिक सरकारी इस्पितळात दाखल करुन नंतर सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. 28 वषीय महिला दोन मुलींची आई आहे. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचे समजते.
दरम्यान राष्ट्रीय महिला फेडरेशनच्या राज्य सचिव प्रमोदा हजारे यांनी शनिवारी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देवून जखमी महिलेची विचारपूस केली. तिच्यावर व्यवस्थीत उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासन व बिम्सच्या अधिकाऱयांशी चर्चा केली. ऍसिड हल्ल्यातील जखमींना भरपाई दिली जाते. ती भरपाई तातडीने देण्याची विनंती त्यांनी केली आहे.