बाबा… आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अशी व्यक्ती, जे आपल्या पाल्याला खुश ठेवण्यासाठी, त्याचे भविष्य घडवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करतात. जीवनात आधार देणारे, सोबत चालणारे आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे बाबा प्रत्येकासाठीच सुपरहिरो असतात. आपल्या सगळय़ांच्याच आयुष्यातील या “सुपरहीरो’’ला “फादर्स डे’’ च्या निमित्ताने एक अनोखी भेट देण्याचा प्रयत्न जून चित्रपटाच्या टीमने आणि ‘प्लॅनेट मराठी’च्यावतीने करण्यात आला आहे. ‘जून’ चित्रपटातील ‘बाबा’गाण्याचं रिप्राईज व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. निखिल महाजन यांचे शब्द असलेल्या या गाण्याला शाल्मलीने संगीत दिले आहे तर आनंदी जोशीचा या गाण्याला आवाज लाभला आहे. या गाण्यात नेहा पेंडसे बायस, शाल्मली, आनंदी जोशी, रेशम श्रीवर्धन यांच्यासोबत सिनेसृष्टीतील अमृता खानविलकर, प्रिया बापट, गिरीजा ओक गोडबोले, मृण्मयी गोडबोले, पर्ण पेठे, गौरा नलावडे, संस्कृती बालगुडे याचीही या गाण्याला साथ लाभली आहे.
बाबा विषयी भावना व्यक्त करताना शाल्मली म्हणते, आपण अनेकदा वडिलांना द्यायला हवे तितके महत्व देत नाही. मला खूप अभिमान वाटतो, की ‘जून’मधील बाबा हे गाणे सोलो फिमेल ट्रक असून आनंदी जोशीने खूपच सुंदर गाणं सादर केलं आहे. जेव्हाजेव्हा मी हे गीत ऐकते तेव्हा तेव्हा मी कृतज्ञतेने भारावून जाते. मला खात्री आहे, की अशीच भावना प्रेक्षकांचीही असेल. अभिनेत्री नेहा पेंडसे बायस सांगते, आयुष्यात भरभराट होण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते. ब्लू ड्रॉप प्रा.लि.चे निखिल महाजन व पवन मालू निर्मित, सुहृद गोडबोलेसह वैभव खिस्ती दिग्दर्शित जूनमध्ये नेहा पेंडसे बायस, सिद्धार्थ मेनन, करमरकर, रेशम श्रीवर्धन, निलेश दिवेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.