अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये फायजरची लस टोचून घेतल्याच्या 7 दिवसांनी एक वैद्यकीय कर्मचारी कोरोनाबाधित झाला आहे. मॅथ्यू डब्ल्यू नावाची व्यक्ती दोन रुग्णालयांमध्ये आरोग्य कर्मचारी म्हणून काम करतो. त्यांनी 18 डिसेंबर रोजी लस घेतली होती. लस घेतल्यावर कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम झाले नसल्याचे त्यांनी सांगितले होते.
लस घेतल्याच्या 6 दिवसांनी कोविड-19 युनिटमध्ये काम केल्यावर आजारी पडले. या लक्षणांनंतर त्यांनी कोरोनाची चाचणी करवून घेतली होती. कोरोनाच्या विरोधात रोगप्रतिकारकक्षमता निर्माण होण्यास 10 ते 14 दिवसांचा कालावधी लातो. लसीचा पहिला डोस सुमारे 50 टक्के सुरक्षा देतो, तर 95 टक्के सुरक्षेसाठी दुसऱया डोसची गरज असते.