ऑनलाईन टीम / जेरुसलेम :
फायझरची कोरोना प्रतिबंधक लस लहान मुलांसाठीही प्रभावी असल्याचा दावा इस्राईलने केला आहे.
इस्राइलमधील लसीच्या टास्क फोर्सचे प्रमुख बोझ लेव्ह म्हणाले, आम्ही आतापर्यंत 12 ते 14 वयोगटातील जवळपास 600 मुलांना फायझरची लस दिली आहे. त्यांच्यावर कोणतेही मोठे दुष्परिणाम दिसून आले नाहीत. त्यावरून ही लस लहान मुलांवरही प्रभावी असल्याचे दिसून आले.
त्यानंतर गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या किशोरवयीन मुलांना लस देण्याची शिफारस इस्राईलच्या आरोग्य मंत्रालयाने सरकारकडे केली आहे.