ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
फायझर या औषध निर्मिती कंपनीच्या भारतीय शाखेने कोरोना प्रतिबंधक लसीच्या औपचारिक मंजुरीसाठी भारतीय औषधी महानियंत्रकांकडे (DCGI) अर्ज केला आहे.
मागील तीन दिवसांपासून ब्रिटन सरकारने फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लसीच्या वापराला मंजुरी दिली आहे. फायझर-बायोएनटेकची लस कोरोनावर 95 टक्के प्रभावी आहे. ही लस व्यापक वापरासाठी योग्य असल्याचे ब्रिटिश नियामक MHRA ने म्हटले आहे. ब्रिटननंतर बरहीननेही शुक्रवारी या लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे.
त्यानंतर फायझर इंडियाने लसीच्या वापरासाठी परवानगी मागितली आहे. औषध नियामकाला केलेल्या अर्जात कंपनीने देशात लस आयात करणे आणि वितरणाशी संबंधित मंजुरी देण्याविषयी अर्ज केला आहे. त्यामध्ये औषध आणि क्लिनिकल परीक्षण नियम, 2019 च्या विशेष तरतुदींअंतर्गत भारतातील लोकांवर क्लिनिकल परीक्षणाची सूट देण्याची मागणी केली आहे.