ऑनलाईन टीम / जिनिव्हा :
फायझर-बायोएनटेक लसीच्या आपत्कालीन वापराला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली आहे. त्यामुळे इतर देशांना ही लस आयात करण्यास मार्ग मोकळा झाला आहे.
फायझर कंपनीने लस निर्मितीत सुरुवातीपासूनच आघाडी मिळवली होती. फायझरची ही लस 95 टक्क्यांहूनही अधिक प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सुरुवातीला ब्रिटनने 8 डिसेंबरला या लशीला मान्यता देऊन लसीकरणाची मोहीम सुरु केली. त्यानंतर अमेरिका, कॅनडा आणि इतर युरोपियन देशांनीही या लसीला मान्यता दिली.
जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या आणि जगभरातील तज्ज्ञांद्वारे फायजर लसीच्या सुरक्षा, प्रभावी आणि गुणवत्तेच्या माहितीची पडताळणी केली. फायदे आणि जोखिमांचे मूल्यांकन केले. त्यानंतर या लसीला जागतिक मान्यता दिली.