वेट लिफ्टींग अर्थात विशिष्ट पद्धतीने वजन उचलणे हा एक व्यायामाचा प्रकार आहे. सर्वेक्षणानुसार वेट ट्रेनिंग प्रोग्राम हा स्नायूंची बळकटी वाढवण्याबरोबरच वजन घटविण्यासाठी, आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्याचबरोबर आयुष्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे.
- फारशी हालचाल नसणे आणि वाढते वय यामुळे हाडांची घनता कमी होते आणि हाडे ठिसूळ बनतात. निरीक्षणातून आणि अभ्यासातून स्पष्ट झाले आहे की, सातत्याने स्ट्रेंथ ट्रेनिंग घेतल्यास हाडांची घनता वाढते आणि ऑस्टिओपोरोसीस अर्थात हाडांचा ठिसूळपणा येणे यापासून संरक्षण होते.
- वेट ट्रेनिंगमुळे स्नायूंची आणि सांध्यांची क्षमता वाढल्याने लागण्याची, दुखण्याची तीव्रता कमी होते.
- या व्यायामामुळे टेन्डॉन्स आणि लिगामेंट्स पटकन इंज्युअर्ड होत नाहीत. हाडांची घनता आणि ताकद वाढल्यामुळे पाठीचे आणि गुडघ्यांचे दुखणे कमी होते. संतुलन, लवचिकता, गतिशीलता आणि स्थिरता यांच्या गुणवत्तेतही यामुळे वाढ होते.
- वेट ट्रेनिंगमुळे कोरोनरी डिसिजेस अर्थात हृदयाच्या धमण्यांशी संबंधित आजार घटतात. खासकरून यामुळे कोलेस्टरॉलची पातळी नियंत्रणात राहते. तसेच रक्तदाबही कमी होतो.
- शारीरिक व्यायाम आपल्याला अधिक आनंदी आणि सक्षम बनवतात. तुम्ही नियमित वेट ट्रेनिंग घेत असाल तर खेळण्याची आणि इतर
व्यायामाची क्षमता दुपटीने वाढते.