मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी /बेळगाव
खडेबाजार येथील मुथ्थुट मायक्रोफीन लि. या फायनान्स कंपनीत लोन रिकव्हरीचे काम करणारा एक तरुण गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. यासंबंधी त्याच्या भावाने मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
श्रीशैल बसाप्पा पटगुंदी (वय 27) असे त्याचे नाव आहे. तो मूळचा होसूर (ता. रबकवी-बनहट्टी) येथील राहणारा आहे. दि. 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजता आपल्या ऑफीससमोर वाहन उभे करून तो बेपत्ता झाला आहे.
त्याचा चेहरा गोल असून अंगात निळे जॅकेट, शर्ट, पँट परिधान केलेल्या या युवकाला कन्नड व इतर भाषा बोलता येतात. तरी या तरुणाविषयी कोणाला माहिती मिळाल्यास 0831-2405242 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.