प्रतिनिधी/ बेळगाव
देशातील प्रत्येक नागरिकाने तंदुरुस्त रहावे, यासाठी फिट इंडिया हे अभियान देशभर चालविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून तोराळी (ता. खानापूर) येथील कोब्रा स्कूलतर्फे बेळगाव ते बेंगळूर या फिट इंडिया फ्रीडम मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनमध्ये नागरिकांना आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सोमवारी हे जवान बेळगावमधून बेंगळूरच्या दिशेने रवाना झाले. तोराळी येथील कोब्रा टेनिंग स्कूलमधून या मॅरेथॉनला सुरुवात झाली. चार दिवसात अंदाजे 500 कि. मी. धावत जाऊन हे जवान बेंगळूरला पोहोचणार आहेत. कोब्रा स्कूलचे प्राचार्य ब्रिगेडियर एस. के. लामा यांनी या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखविला.