बेळगाव : देशातील सर्वात मोठी पीव्हीसी पाईप उत्पादन कंपनी असणाऱया फिनोलेक्स कंपनीकडून प्लम्बिंग डे साजरा करण्यात आला. बेळगाव परिसरातील चारशेहून अधिक प्लंबरना या कार्यक्रमाला बोलावून त्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला फिनोलेक्स कंपनीचे कर्नाटक विभागाचे विक्री उपव्यवस्थापक अरुण अलासे उपस्थित होते.
पै रिसॉर्ट येथे दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित मान्यवर व प्लंबरच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. फिनोलेक्सचे बेळगाव प्रतिनिधी रामकृष्ण जी. एस. व इन्चार्ज सुनील माळी यांनी उपस्थित प्लंबरना प्लम्बिंग डे च्या शुभेच्छा दिल्या.
कर्नाटक विभागाचे विक्री उपव्यवस्थापक अरुण अलासे म्हणाले, फिनोलेक्स कंपनी ही देशातील सर्वात मोठी पीव्हीसी पाईप उत्पादक कंपनी आहे. प्लंबर, डिस्ट्रीब्युटर व ग्राहकांनी दिलेल्या सहकार्यामुळेच आम्ही देशभर व्यवसाय करीत आहोत. यापूर्वी फिनोलेक्स पाईप हे केवळ कृषी क्षेत्रापुरतेच मर्यादित होते. परंतु कंपनीने कन्स्ट्रक्शन पाईपच्या उत्पादनाला सुरुवात करत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. बेळगाव जिल्हय़ातील प्रत्येक गावात पोहोचून पीव्हीसी आपला व्यवसाय करत आहे. बेळगाव शहरात 120 हून अधिक तर जिल्हय़ात 400 हून अधिक काऊंटर असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रदीप मेस्त्री, बाळू आनंदाचे, निंगाणी लाड, सुनील आनंदाचे, जमीर मुल्ला, मारुती मंडोळकर, नागेश मोरकर, अर्जुन मुचंडी, सुरेश कांबळे यांच्या हस्ते केक कापून प्लंबर डे साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित मनोरंजन कार्यक्रमाने रंगत आणली. जुन्या बहारदार गाण्यांसह मराठमोळी लावणी कार्यक्रमात सादर करण्यात आली. यावेळी बेळगाव परिसरातील प्लंबर, डिस्ट्रीब्युटर्स मोठय़ा संख्येने उपस्थित होते.