वृत्तसंस्था/ अबु धाबी
शनिवारी रात्री येथे झालेल्या फिफाच्या क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चेल्सीने पाल्मेरीसचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करत अजिंक्यपद पटकाविले.
या सामन्यात जादा वेळेतील कालावधी संपण्यास 3 मिनिटे बाकी असताना जर्मनीच्या हॅवर्ट्झने चेल्सीचा दुसरा आणि निर्णायक गोल केला. या विजयामुळे चेल्सीचा फुटबॉल क्लब आता जगातील फिफाचा क्लबस्तरीय विश्व चषक विजेता म्हणून ओळखला जाईल. या सामन्यात पूर्वार्धात हॅवर्ट्झने हेडरद्वारे चेल्सीचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत चेल्सीने 1-0 अशी आघाडी मिळविली होती. मात्र उत्तर्रार्धात पालमेरीस क्लबला राफेल व्हेगाने बरोबरी साधून दिली. निर्धारित वेळेत दोन्ही संघ बरोबरीत राहिल्याने पंचांनी जादा कालावधीचा अवलंब केला. दरम्यान सामन्यातील 117 व्या मिनिटाला जर्मनीच्या हॅवर्ट्झने पेनल्टीवर चेल्सीचा दुसरा आणि निर्णायक गोल केला. चेल्सीने आतापर्यंत सलग नऊवेळा फिफाची क्लबस्तरीय विश्वचषक फुटबॉल स्पर्धा जिंकली आहे.