झ्युरिक
: फिफाने शुक्रवारी जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघाने 108 वे स्थान कायम राखले आहे. ताज्या क्रमवारीत बेल्जियमने आपले अग्रस्थान कायम राखले असून फ्रान्स दुसऱया तर ब्राझील तिसऱया स्थानावर आहे. कोरोना विषाणूचा फटका फुटबॉल क्षेत्राला मोठय़ा प्रमाणावर बसला फिफा विश्वचषक पात्रता स्पर्धेसह कोपा अमेरिका, युफा चॅम्पियनशिप, युरो चषक स्पर्धा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकल्या आहेत. अशा परिस्थीतीत फिफा क्रमवारीत कोणताही बदल झाला नसून भारतीय संघाने आपले 108 वे स्थान कायम राखले आहे. याशिवाय, क्रोएशिया चौथ्या, इंग्लंड पाचव्या, पोर्तुगाल सहाव्या, उरुग्वे सातव्या, स्वीत्झर्लंड आठव्या, स्पेन नवव्या तर डेन्मार्क दहाव्या स्थानी विराजमान आहे.