33 वर्षांपूर्वी 1800 किलोमीटर दूर अपहरण
स्मरणशक्तीच्या आधारावर काढला गावाचा नकाशा
33 वर्षांपूर्वी बालपणी अपहरण झालेला मुलगा स्वतःच्या आईकडे पुन्हा पोहोचला आहे. हे शक्य झाले कारण त्याने स्वतःच्या स्मरणशक्तीच्या आधारावर गावाचा नकाशा तयार केला. हा नकाशा त्याने सोशल मीडियावर शेअर केला आणि त्याच्या मदतीने पुन्हा कुटुंबाला भेटू शकला. ही घटना चीनमधील असून 1989 मध्ये हेनान प्रांतात 4 वर्षीय ली जिंगवेई याचे शेजारच्या एका व्यक्तीने बालतस्करीसाठी अपहरण केले होते.
अपहरणकर्त्याने 1800 किलोमीटर अंतरावरील गुआंगडोंग प्रांतात ली याला एका दांपत्याला विकले होते. त्यानंतर कुटुंब आणि गावाशी लीचा संपर्क संपुष्टात आला. वर्षामागून वर्षे गेली, परंतु लीच्या मनातील आई आणि गावाच्या आठवणी मिटल्या नाहीत. त्याने अनेकदा स्वतःच्या पालकांना गावी जाऊन खऱयाला आई भेटवा अशी विनंती केली. ली च्या विनवण्यानंतरही त्याला खरेदी करणाऱयांचे मन पाघळले नाही.
लीने स्मरणशक्तीला जोर देत नकाशा तयार केला. नकाशा त्याच्या गावाच्या रचनेशी मिळताजुळता होती. इंटरनेटच्या मदतीने स्वतःची आई आणि गावाचा शोध घेण्याची सूचना त्याला एका व्यक्ती केली. त्यानंतर लीने हा नकाशा इंटरनेटवर अपलोड केला. तसेच बालतस्करीचा बळी ठरण्याची कहाणीही जोडली. डिसेंबर महिन्या त्याच्या खऱया आईच्या सोशल मीडियावरील ही कहाणी निदर्शनास आली.
डीएनए चाचणी
व्हिडिओ शेअरिंग ऍपद्वारे माहिती मिळताच ली स्वतःला जन्म देणाऱया आईला 24 डिसेंबर रोजी भेटला. दोघेही भेट होताच हमसून हमसून रडू लागले. लीच्या दाव्यानुसार त्याची डीएनए चाचणी करण्यात आल्यावर त्याची खरी ओळख पटली.