प्रतिनिधी/ बेळगाव
कॅन्टोमेंट परिसरातील विकासकामे राबविण्यासाठी निधी नसल्याची तक्रार कॅन्टोन्मेंटकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यामुळे आमदार अनिल बेनके यांनी कॅम्प फिश मार्केटच्या विकास कामासाठी 50 लाख रुपये मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. राज्य शासनाकडून सदर निधी मंजूर करण्यात आला आहे.
कॅम्पमधील फिश मार्केट हा मुख्य भाग आहे. शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत विविध विकासकामे सुरू आहेत. मात्र, कॅन्टोन्मेंट हद्दीतील विकासकामे राबविण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे विकासकामे रखडली आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डकडेदेखील निधी नसल्याने विकासकामे राबविणे अशक्मय आहे. त्यामुळे विकासकामे राबविण्यासाठी आमदार निधीतून अनुदान मंजूर करावे, अशी मागणी कॅन्टोन्मेंटच्या बोर्डच्या बैठकीत करण्यात आली होती. त्यामुळे फिश मार्केटच्या विकासाकरिता 50 लाख मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आमदार अनिल बेनके यांनी निधीकरिता श्रीनिवास पुजारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. फिश मार्केटच्या विकासाकरिता 50 लाखांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. त्यामुळे पाहणी करून आराखडा तयार करावा व विकासकामे सुरू करावीत, अशी सूचना आमदार अनिल बेनके यांनी अधिकाऱयांना केली.
यावेळी आमदारांसमवेत कर्नाटका फिश डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे एम. एल. दोड्डमणी, अभियंते अमरनाथ, सहसंचालक श्रीपाद कुलकर्णी व इतर अधिकारी उपस्थित होते.