सध्या बऱयाच युझर्सना व्हाट्सअपवर एक नोटीफिकेशन येत आहे. जर आले नसेल तर येणार आहे आणि हो, हे प्रत्येक व्हाट्सअप युझरला येणार आहे. काय आहे हे नोटीफिकेशन..तर हे आहे व्हाट्सअपच्या बदललेल्या किंवा उपडेड झालेल्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत.
मालक कंपनी फेसबुकने आपल्या व्हाट्सअपच्या प्रत्येक युझरने दि. 8 फेब्रुवारी पर्यंत ही पोलिसी स्वीकारायची आहे. जर हे स्वीकारले नाही तर तुम्ही व्हॉट्सअप वापरू शकणार नाही. थोडक्मयात हे स्वीकारा अन्यथा वापरू नका. मग काय आहेत या अपडेटेड प्रायव्हसी पॉलिसी. त्या स्वीकारायच्या की नाकारायच्या.
या व्हाट्सअपने ‘आम्ही सांगतो ते मान्य करा, अथवा अकाउंट डिलिट करू, वापरू नका’ अशा गोड भाषेमध्ये धमकी दिल्याने एकच खळबळ उठली आहे. या प्रायव्हसी पॉलिसीमुळे आपला डेटा आता सुरक्षित असेल का, भविष्यात राहील का अशी वापरकर्त्यांना चिंता आहे.
मग या व्हाट्सअपची नवीन पॉलिसी आहे तरी काय.
आतापर्यंत ज्या व्हाट्सअपने युझरचा डेटा सुरक्षित ठेवतो असा दावा केला होता त्यांनी हा डेटा आता फेसबुक व इन्स्टाग्रामसोबत शेअर करायचा ठरविले आहे. फोन नंबर, आर्थिक व्यवहारासंबंधी डेटा (व्हाट्सअपवर आता युपीआय पेमेंट्स भारतामध्ये सुरू करत आहेत), सेवेसंदर्भातील माहिती, आपण इतरांशी (व्यवसायांसह) कसा संवाद साधता याविषयी माहिती, मोबाइल डिव्हाइस माहिती आणि आयपी ऍडेस. याच बरोबर फोनची बॅटरी लेव्हल, सिग्नल स्ट्रेंथ, टाईम झोन, इंटरनेट प्रोव्हायडरबाबत माहिती गोळा केली जाणार आहे. अर्थात हे सर्व डिव्हाइस हार्डवेअर लेव्हलला ही माहिती संकलित करून थर्ड पार्टीला शेअर केली जाणार आहे. हा डेटा फेसबुकसह त्यांच्या इतर कंपन्यांमध्ये का शेअर केला जाणार आहे. व्हाट्सअपचे म्हणणे आहे की चांगली सुरक्षा सुनिश्चित करणे आणि स्पॅमशी (इतर नको असलेले मसेज) लढा देण्यासाठी शेअर केला जाणार आहे असे सांगण्यात येत आहे. थोडक्मयात काय तर आपला डेटा हा क्रॉस प्लॅटफॉर्म (फेसबुक, इन्स्टाग्राम व व्हाट्सअप) वर शेअर करून इंटरऑपरेबिलिटी ठेवली जाणार आहे ज्याचा फायदा फेसबुकला आपले सोशल मीडिया जग ताब्यात ठेवून पैसे अधिक मिळवता येणार आहे.
मग डेटा शेअर केल्याने नक्की काय होणार?
या इंटरऑपरेबिलिटी फीचरमुळे तुमच्या पर्सनल डेटाचा उपयोग टार्गेटेड ऍडव्हरटाइजिंग आणि पॉलिटिकल कॅम्पेनसाठी वापरला जाऊ शकतो. म्हणजे जर तुम्ही चॅटवर एखाद्या विषयासंबंधी बोलत असात तर तुम्हाला त्या विषयाच्या जाहिताती व्हाट्सअपवर येऊ शकतात. राजकीय पक्ष, उमेदवाराबाबत प्रचार इ. नागरिकांमध्ये माहिती (नको असली तरी) पाठविणे, असे होऊ शकते. अर्थात आपण जे व्यक्त होतो त्यासंबंधी माहिती प्रसारित किंवा जाहिराती दाखवणे सुरू होणार आहे. सध्यातरी जाहिराती व्हाट्सअपवर येत नाही आहेत मात्र भविष्यामध्ये येण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. व्हाट्सअपने नुकतीच स्वतःची युपीआय व्हॉट्सअप पेमेंट सिस्टीम सुरू केली आहे. इथेही प्रत्येक व्यवहाराची माहिती संकलित होणार आहे.
व्हॉट्सऍपला दुसरा पर्याय काय?
कदाचित टेलिग्राम, सिग्नलसारखे मेसेंजर ऍप सध्या उपलब्ध आहेत. व्हाट्सअपने हा डेटा आपल्या मालक कंपनीकडे वर्ग (शेअर) करायचे ठरविले आहे म्हणून युझर इतर मेसेंजरकडे वळतो आहे, मात्र हे ऍप किती सुरक्षित आहेत याची खातरजमा करणेही गरजेचे आहे. टेलिग्राम हे ओपन सोर्स फ्री मेसेजिंग ऍप आहे. याची डेटा सेंटर्स जगभरामध्ये पसरली आहेत. टेलिग्राम ही मुळात दोन रशियन भाऊ निलोलाय व पावेल दुरोव्ह यांनी स्थापन केलेली कंपनी असून तिने आपले बस्तान नंतर बर्लिनला हलवले, नंतर इंग्लंडमधून ती कंपनी आता दुबईला स्थित आहे. डेट सिक्मयुरिटीसंबंधी टेलिग्रामचे मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल दुरोव्ह यांनी एका ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, ‘आम्ही आमच्या स्वतःच्या डिस्ट्रिब्युटेड क्रॉस-ज्युरिडिक्शनल एनक्रिप्टेड क्लाउड स्टोरेजवर अवलंबून आहोत, जे जास्त संरक्षित आहे’ हे जरी खरे असले तरी आपला डेटा हा कुठल्याही डेटा सेंटरमध्ये स्टोअर होऊ शकतो.
सिग्नल मेसेंजिंग ऍप हे नवे ऍप आले आहे. सिग्नल फाउंडेशन व्हॉट्सऍपचे सह-संस्थापक ब्रायन
ऍक्टन आणि सिग्नल मेसेंजरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोक्सी मार्लिनस्पिक यांनी ते तयार केले. ऍक्टनने 2017 मध्ये व्हॉट्सऍप सोडला आणि सिग्नलच्या मदतीसाठी 50 दशलक्ष डोनेशन देऊन सुरू केले. या ऍपमध्ये मेसेज एनक्रोपशन, चॅट बॅकअप, स्क्रीन लॉकसारखे फीचर्स आहेत मात्र यांच्या सिक्मयुरिटी पॉलिसी कशा बदलतील हे सध्यातरी सांगता येत नाही. त्यामुळे व्हाट्सअपला दुसरा पर्याय म्हणजे आगीतून फुफाटय़ात असे होणार आहे.
व्हॉट्सऍप वापरायचे की बंद करायचे?
खरे तर आता स्वतःचे प्रायव्हेट असे सोशल मीडियावर काहीही राहिलेले नाही. युझर जे काम करतो, जी माहिती देतो, जे आर्थिक व्यवहार करतो ते सर्व कुठेतरी साठविले जात असते. म्हणजे नोकरी डॉट कॉम असेल मॅट्रिमोनिअल साईटवर असेल, अगदी ट्रूकॉलरचा डेटा (कॉन्टॅक्ट लिस्ट) सुद्धा तुम्हाला तसेच इतरांना उपलब्ध होत आहे. हे सर्व युझरला आम्ही फक्त ऍक्सेस करणार’ या नावाखाली डेटा गोळा करत आहेत तर व्हाट्सअप युझरला राजरोसपणे सांगून करत आहे. 1. सध्यातरी वैयक्तिक माहिती चॅटद्वारे देऊ नये. 2. कोणतेही पासवर्ड, आयडी, ओटीपी पाठवू नयेत. 3. महत्त्वाच्या फाईल शेअर करू नये. 4. पैशाच्या व्यवहारासंबंधी कोणतीही माहिती चॅटद्वारे करू नये.
सध्या सायबर/डेटा सिक्मयुरिटीबाबत विधेयक प्रलंबित आहे. याबाबत भारताच्या नागरिकांच्या डेटा सुरक्षिततेसाठी तज्ञ समिती गठित करून कायद्यामध्ये योग्य ते बदल सुचविणे व दुरुस्ती करणे गरजेचे आहे. सद्य काळामध्ये डेटा सिक्मयुरिटी ही आणीबाणी ठरत आहे व त्यावर राष्ट्रीय पातळीवर तातडीने उपाय योजणे आवश्यक आहे.
विनायक राजाध्यक्ष