प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिका व्यापारी संकुलासमोरील बसवेश्वर चौक ते डाक बंगल्यापर्यंतच्या रस्त्याशेजारील फुटपाथ जेसीबीने खोदण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या झाडांची मुळे उघडी झाली आहेत. परिणामी ही झाडे कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून, याबाबत आवश्यक उपाय योजना राबविण्यात यावीत अशी मागणी परिसरातील व्यापाऱयातून होत आहे.
बसवेश्वर चौक ते बॅ. नाथ पै चौक पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. या करिता रस्त्याच्या दुतर्फा पाईप घालण्याचे काम सुरू आहे. सध्या महापालिका व्यापारी संकुलासमोरील रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. रस्त्याच्या शेजारी पाईप घालण्यासाठी येथील फुटपाथ जेसीबीने हटविण्यात आले आहे. फुटपाथ हटविताना झाडांच्या बुध्यावरील माती हटविण्यात आली आहे. व्यापारी संकुलासमोर झाडांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. माती हटविण्यात आल्यामुळे झाडांची मुळे खुली झाली आहेत. त्यामुळे सदर झाडे कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. खोदाई करण्यात आल्याने पावसाचे पाणी साचून राहत आहे. झाडे उंच असून, सदर झाडांची मुळे जास्त खोल नसतात. वाऱयामुळे ही झाडे व्यापारी संकुलावर कोसळण्याचा धोका आहे. व्यापारी संकुलात वाहने आणि नागरिकांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात असते. तसेच जोरात पाऊस झाल्यास नागरिक आणि दुचाकी वाहन चालक झाडाखाली थांबतात. त्यामुळे झाडांचा धोका नागरिकांना बसण्याची शक्मयता आहे. अनर्थ घडण्यापूर्वी महापालिका प्रशासनासह स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांनी येथील परिस्थितीची पाहणी करून आवश्यक खबरदारीच्या उपाय योजना राबविण्यात याव्यात अशी मागणी येथील व्यापारी करीत आहेत.