महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांची माहिती, फेरीवाल्यांसाठी अन्य ठिकाणी व्यवस्था होणार
प्रतिनिधी /बेळगाव
शहर आणि उपनगरांतील पादचाऱयांसाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत फुटपाथ निर्माण करण्यात आले आहेत. मात्र या फुटपाथचा वापर फेरीवाल्यांनी चालविला आहे. याबाबत लवकरच कारवाई करून फेरीवाल्यांसाठी अन्य ठिकाणी व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी दिली.
फेरीवाल्यांच्या समस्येबाबत कोणती कारवाई करणार, अशी विचारणा महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांच्याकडे केली असता येत्या काही दिवसांत अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे फुटपाथवर बसणाऱया फेरीवाल्यांना हटविण्यात येईल, असे सांगितले. तसेच हॉकर्स झोन निर्माण करून त्या ठिकाणी फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. फुटपाथ, सायकल ट्रक, दुभाजक आणि डेकोरेटिव्ह पथदीप बसवून स्मार्ट रोड बनविण्यात येत आहेत. मात्र फुटपाथ तयार होताच त्या ठिकाणी फेरीवाले ठाण मांडून व्यवसाय करीत आहेत. शहर आणि उपनगरांतील प्रत्येक फुटपाथवर फळविपेते, भाजीविपेते तसेच विविध खाद्यपदार्थांच्या हातगाडी चालकांनी अतिक्रमण केले आहे. काही ठिकाणी तर व्यावसायिकांनी फुटपाथवर खोकी थाटून व्यवसाय चालविला आहे. त्यामुळे ये-जा करण्यासाठी पादचाऱयांना रस्ता उपलब्ध होत नाही. परिणामी पादचाऱयांना रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे.
नागरिकांच्या तक्रारी वाढल्या
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या प्रत्येक रस्त्याशेजारील फुटपाथचा वापर फेरीवाल्यांनी चालविला आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
प्रशासन कोणती कारवाई करणार?
वर्षानुवर्षे रस्त्याशेजारी थांबून व्यवसाय करतो व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. त्यामुळे हॉकर्स झोन निर्माण करून दिल्यास त्या ठिकाणी स्थलांतर करण्याची भूमिका फेरीवाल्यांनी स्पष्ट केली आहे. तर फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन उपलब्ध करून देण्यास महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन कोणती कारवाई करणार? याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.