स्मार्ट सिटीमधील फुटपाथ, सायकल ट्रकचा दुरुपयोग, मनपाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्यासाठी फुटपाथची उभारणी आणि सायकल ट्रक निर्माण करण्यात आले आहे. फुटपाथवरील अतिक्रमणे हटविण्याची सूचना स्मार्ट सिटी कंपनीच्या कार्यकारी संचालकांनी महापालिका अधिकाऱयांची बैठक घेवून केली. होती. मात्र या बैठकीचा कोणताच उपयोग झाला नाही. अद्यापही सायकल ट्रकचा वापर वाहन पार्किंगकरिता आणि फुटपाथचा वापर फेरीवाले करीत आहेत. यामुळे फुटपाथ नेमके कुणासाठी, असा मुद्दा उपस्थित होत आहे.
स्मार्ट सिटी योजने अंतर्गत शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक उभारण्याबरोबर फुटपाथ निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे. तसेच काही रस्त्याशेजारी सायकल ट्रकदेखील निर्माण करण्यात आले आहे. मात्र सायकल ट्रकचा वापर दुचाकी वाहने पार्क करण्यासाठी होत असून फुटपाथवर फेरीवाल्यांनी व्यवसाय थाटून अतिक्रमण केले आहे. सध्या विविध रस्त्यांचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. काही रस्त्यांचे काम अर्धवट स्थितीत आहे. रस्त्याचे काम पूर्ण करून पादचाऱयांसाठी फुटपाथ बांधण्यात आले आहे पण फुटपाथवरील अतिक्रमणे आणि विद्युत खांब, ट्रान्स्फॉर्मर हटविण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. एपीएमसी रोडच्या दुतर्फा गटारीचे बांधकाम पूर्ण करून फुटपाथ निर्माण करण्यात आले आहे. पण फुटपाथवरील विद्युत ट्रान्स्फॉर्मर स्थलांतर करण्यात आले नाही. त्यामुळे सदर विद्युत ट्रान्स्फॉर्मर फुटपाथवर आडवे आहे. त्यामुळे परिसरातील व्यावसायिकांनी फुटपाथवरील जाहिरात फलकदेखील हटविण्याकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच ट्रान्स्फॉर्मर ते जाहिरात फलकाच्या परिसरातील फुटपाथवर विविध साहित्य ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे फुटपाथचा दुरुपयोग होत आहे. सदर फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने यावरून पादचाऱयांनी ये-जा कशी करायची, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
फुटपाथ नेमके कुणासाठी?
पादचाऱयांसाठी फुटपाथ निर्माण करण्यात आले आहेत, मात्र सदर फुटपाथवर फळविपेते, भाजी विपेत्यांनी तसेच विविध व्यावसायिकांनी ठाण मांडले आहे. तसेच रस्त्याशेजारी वाहन पार्किंगची सुविधा करण्यात आली नसल्याने वाहनधारक सायकल ट्रकमध्ये वाहने पार्क करीत आहेत. त्यामुळे निर्माण करण्यात आलेली फुटपाथ आणि सायकल ट्रकची सुविधा कुणासाठी, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. फुटपाथवरील वाढत्या अतिक्रमणाची दखल घेवून स्मार्ट सिटी कंपनीचे कार्यकारी संचालक शशीधर कुरेर यांनी महापालिका कार्यालयात विशेष बैठक आयोजित केली होती. तसेच फुटपाथवरील अतिक्रमणे हटविण्याबरोबर फुटपाथवरील फेरीवाले, जाहिरात फलक आणि विद्युत उपकरणे हटविण्याची कारवाई करण्याची सूचना महापालिका अधिकाऱयांना केली होती. फुटपाथ हे केवळ पादचाऱयांसाठी निर्माण करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱयांना दिली होती. तसेच याबाबत आवश्यक कारवाई करण्याचा आदेश महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी बजावला होता. मात्र महापालिकेच्या महसूल विभागाच्या अधिकाऱयांनी कोणतीच कारवाई केली नाही. तर स्मार्ट सिटी योजनेंतर्गत फेरीवाल्यांसाठी फुटपाथ निर्माण करण्यात आले आहे का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. स्मार्ट सिटी कंपनीचे कार्यकारी संचालक आणि महापालिका आयुक्तांच्या आदेशाला वाटाणाच्या अक्षता लावल्या असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.