स्वामी विवेकानंद जयंती निमित्त माजी आमदार अमल महाडिक यांचा उपक्रम
प्रतिनिधी/कोल्हापूर
“एकता, समन्वय आणि विजय ही फुटबॉल या खेळाची वैशिष्ट्ये अंगी आली तर हेच युवक कोणताही सामाजिक बदल घडवून आणू शकतील म्हणून भारतातील सर्व युवांनी फुटबॉल खेळला पाहिजे” असा आग्रह करणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने माजी आमदार अमल महाडिक यांच्या सौजन्याने Kolhapur Juggling Competition स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही ऑनलाईन स्पर्धा ऑनलाईन असून १२ जानेवारी ते १३ जानेवारी दरम्यान आपल्या जगलिंगचा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाउंटवर हे अपलोड करून @amal.mahadik @shoumikamahadik या अकाउंटला टॅग करणे अनिवार्य आहे.
ही स्पर्धा कनिष्ठ गट व वरिष्ठ अशा दोन गटात घेतली जाणार आहे. यासाठी १७ वर्षांखालील- कनिष्ठ गट व १७ वर्षांवरील- वरिष्ठ गट अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी मोफत प्रवेश असणार आहे. तर विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र मिळणार आहे.
नियम-
- आपला व्हिडिओ १ मिनिटापेक्षा जास्त नसावा.
- एका मिनिटात केल्या गेलेल्या जास्तीत जास्त taps वर आधारित विजेता घोषित केला जाईल.
- ही फ्री स्टाईल स्पर्धा आहे.
- या स्पर्धेसाठी वयोमर्यादा नाही.
- फक्त फुटबॉलचाच वापर करणे आवश्यक आहे. इतर बॉलचा वापर करू नये.
- व्हिडिओसह आपण आपले नाव, ठिकाण, तुम्ही सहभाग घेत असलेला गट आणि योग्य हॅशटॅग याचाही उल्लेख करावा 👇 JUGGLERKOLHAPUR
बक्षीस-
वरिष्ठ गट-
प्रथम क्रमांक- 7000/-
द्वितीय क्रमांक- 5000/-
तृतीय क्रमांक- 3000/-
कनिष्ठ गट-
प्रथम क्रमांक- 5000/-
द्वितीय क्रमांक- 3000/-
तृतीय क्रमांक- 2000 /-
अधिक माहितीसाठी संपर्क- 9049077474(व्हाट्स अप फक्त)