वृत्तसंस्था/ बार्सिलोना
स्पेनचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा फुटबॉलपटू झेव्ही हेर्नांडेझला कोरोनाची बाधा झाली आहे. बरीच वर्षे बार्सिलोना क्लबकडून खेळणाऱया झेव्ही हेर्नांडेझने ट्वीटरवर ही माहिती दिली.
स्पॅनिश फुटबॉल स्पर्धेत झेव्हीने यापूर्वी अनेक वर्षे बलाढय़ बार्सिलोना क्लबचे प्रतिनिधीत्व केले. आता तो कतारी क्लबकडून खेळत आहे. झेव्हीने नुकतेच आपल्या कराराचे 5 जुलै रोजी नूतनीकरण केले.
वैद्यकीय उपचार सुरू असून माझ्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे आयसोलेशनमध्ये असलेल्या झेव्हीने सांगितले. कोरोना महामारीमुळे कतार स्टार्स लीग फुटबॉल स्पर्धा तहकूब करण्यात आली होती. आता कतारी कलबचा पहिला सामना काही दिवसानंतर खेळविला जाणार असून या संघाने आपल्या सरावाला शनिवारपासून प्रारंभ केला आहे. कतार स्टार्स लीगच्या नियमानुसार झेव्हीची काही दिवसापूर्वी कोरोना चाचणी घेण्यात आली होती. कतार स्टार्स लीग स्पर्धेच्या गुणतक्त्यात अल साद तिसऱया स्थानावर आहे.