वृत्तसंस्था/ मुंबई
ब्रिटीश फुटबॉलपटू 33 वर्षीय ऍडम ली फाँड्रे आगामी इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामात मुंबई सिटी एफसी संघाकडून खेळणार आहे. फाँड्रे हा यापूर्वी ए लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया सिडनी एफसी संघाचे प्रतिनिधीत्व करीत होता.
2020-21 च्या इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामासाठी मुंबई सिटी एफसी संघाने ऍडम फाँड्रेशी नवा करार केला असून त्याला सिडनी एफसी संघाकडून संपूर्ण फुटबॉल लीग हंगामासाठी कर्जाच्या रूपात खरेदी केले आहे. फाँड्रेच्या सहभागामुळे मुंबई सिटी एफसी संघ अधिक बलवान होईल. तसेच त्याच्या अनुभवाचा फायदा संघाला लाभेल, असे या संघाच्या फ्रांचायजीनी सांगितले. इंग्लीश फुटबॉल स्पर्धेत फाँड्रेने 14 हंगामात बोल्टन वाँडरर्स संघाचे प्रतिनिधीत्व करताना 532 सामन्यांत 183 गोल नोंदविले. 2018 साली फाँड्रे पहिल्यांदा विदेशातील सिडनी एफसी क्लबमध्ये दाखल झाला. ऑस्ट्रेलियातील फुटबॉल क्षेत्रात आपल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर त्याने सिडनी एफसी संघाला दोन महत्त्वाच्या स्पर्धा जिंकून दिल्या. त्याने सिडनी एफसीचे 67 सामन्यांत प्रतिनिधीत्व करताना 45 गोल नोंदविले आहेत.