वृत्त संस्था/ व्हिएन्ना
इटलीचा माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू पावलो रॉस्सी याचे गुरूवारी वयाच्या 64 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. शनिवारी व्हिसेंझा येथे रॉस्सीच्या अंत्ययात्रेमध्ये हजारों फुटबॉल शौकिनांनी आपली उपस्थितीत दर्शवून त्याला श्रद्धांजली वाहिली.
1982 साली फिफाची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱया इटली संघामध्ये रॉस्सीचा समावेश होता. इटलीचे अनेक फुटबॉलपटूंनी तसेच फुटबॉल फेडरेशनतर्फे रॉस्सीला आदरांजली वाहण्यात आली. इटलीने तिसऱयांदा फिफाची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा जिंकताना बलाढय़ ब्राझीलचा 3-2 असा पराभव केला होता. या सामन्यात रॉस्सीने इटलीतर्फे हॅट्ट्रीक नोंदविली होती.