प्रतिनिधी / मडगाव
फातोर्डा येथे काल रविवारी फुटबॉल खेळाताना एक 28 वर्षीय युवक जखमी झाला. त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याला मृत्यू आला. हा युवक आगाळी-फातोर्डा येथील असून त्याचे नाव अलिस्टर वाझ असल्याची माहिती पोलिसांनी दिली. फुटबॉल खेळताना अलिस्टर वाझ हा गंभीररित्या जखमी झाल्याने, मैदानातच कोसळला. त्याच्या सहकाऱयांनी तातडीने त्याच्यावर उपचार करण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्याच्याकडून विशेष असा प्रतिसाद मिळाला नाही. नंतर त्याला इस्पितळात नेले असता त्याला मृत्यू आला. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.