बेळगाव : नारायण जाधव सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठान यांच्यावतीने मागील वषीप्रमाणे यावषीही फुलांची उधळण करत रंगपंचमी साजरी केली जाणार आहे. शहापूर, वडगाव परिसराची रंगपंचमी शुक्रवार दि. 2 रोजी होणार आहे. यावेळी सकाळी 9.30 वा. खासबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हा कार्यक्रम होणार आहे. रंगपंचमी म्हटली की डॉल्बीचा दणदणाट, रासायनिक रंगांचा भडिमार असे वातावरण दिसून येते. परंतु नारायण जाधव सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठानच्यावतीने अनोख्या पद्धतीने रंगपंचमीचा आनंद साजरा केला जातो. यावषी रंगपंचमीवर कोरोनाचे सावट असल्यामुळे सर्व नियम पाळून सामाजिक अंतर राखत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नेताजी जाधव यांनी केले आहे.
Previous Articleजुने बेळगाव कलमेश्वर यात्रा होणार साधेपणाने
Next Article कोरोना लसीकरणाला काकतीत प्रारंभ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.