लॉकडाऊनचा झटका, फुलांची आवक आणि विक्रीही मंदावली
प्रतिनिधी/ सातारा
फुलांचा व्यवसाय फुलला म्हणजे फुलतो नाहीतर फुलासारखा कोमेजतो, अशी म्हण फुल विक्रेत्यांच्या तोंडपाठ असते. सध्या लॉकडाऊनमध्ये त्यांचा व्यवसाय कोमजला आहे. फुलांची विक्री होत नसली तरीही व्यवसाय सोडून चालत नाही. सातारा जिह्यात फुलांचे उत्पादन आणि विक्री होत नसून व्यवसायिक बाहेरुन माल आयात करतात. फुलांचा माल आणताना अनेक संकटे त्यातही विक्री होत नाही. अशा संकटात फुल विक्रेते सापडलेले आहेत.
फुलांचा व्यवसाय सातारा शहरात बसस्थानक, पोवई नाका आणि मोती चौक अशा तीन ठिकाण व्यवसाय चालतो. या व्यवसायात जत्रा, यात्रा, सण उत्सव हाच मुख्य हंगाम असतो. परंतु यावर्षी यात्राजत्रा तर कोरोनामुळे झाल्याच नाही. तर मोठे उत्सव झाले नाहीत. तसेच सणांचा महिना म्हणून श्रावण महिन्याकडे पाहिले जाते. हा श्रावण महिनाही कोरडा ठणठणीत गेला. त्यामुळे फुलांची विक्री सुद्धा झाली नाही. सातारा शहरातील फुल विक्रेत्यांचा व्यवसाय कोमजला आहे. फुलांची आवक सध्या बाहेरुन होत आहे.