दोन दिवसांमध्ये 138 दुचाकीचालकांवर पोलिसांनी केली दंडात्मक कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
वाहतूक पोलिसांनी फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱया दुचाकीस्वारांविरूद्ध कारवाई सुरू केली आहे. वाहतूक उत्तर व दक्षिण पोलिसांनी दोन दिवसांत 138 दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करुन त्यांना सदोष नंबर प्लेट बदलण्यास भाग पाडले आहे.
गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या मार्गदर्शनानुसार उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी व त्यांच्या सहकाऱयांनी रविवारी 70 व सोमवारी 48 असे दोन दिवसांत 118 दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
तर वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक व त्यांच्या सहकाऱयांनी सोमवारी दिवसभरात 20 दुचाकी स्वारांवर दंडात्मक कारवाई केली आहे. दोन दिवसांत एकूण 138 जणांवर कारवाई करुन त्यांना नंबर प्लेट बलण्यास भाग पाडण्यात आले आहे.
तरुणाई आपल्या दुचाकीवर फॅन्सी नंबर प्लेट लावतात. अनेकवेळा नंबर ओळखणेही कठीण होते. एखादा गुन्हा घडल्यास किंवा अपघातानंतर अशा वाहनांचे क्रमांक पाहणे डोकेदुखीचे ठरते. त्यामुळे शासकीय नियमानुसार वाहन चालकांनी आपल्या वाहनांवर नंबर प्लेट लावावी, यासाठी पोलिसांचा आग्रह असतो.
यापूर्वी एखादे दुचाकी, ऑटोरिक्षा किंवा कार अडवून केवळ दंडात्मक कारवाई केली जात होती. आता वरि÷ अधिकाऱयांच्या सुचनेवरुन केवळ दंडात्मक कारवाई न करता नंबर प्लेट बदलण्यास भाग पाडण्यात येत आहे. ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी सांगितले.