बेळगाव : फॅशन प्रदर्शनातील आघाडीचे नाव असलेल्या ‘फॅशनिस्टा’ तर्फे बेळगावात प्रथमच ‘फॅशनव्या’ प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन झाले. ज्येष्ठ रंगकर्मी सुनीता पाटणकर व कीर्ती दोड्डण्णवर यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रीती पावटे, डॉ. नीता देशपांडे, कीर्ती दोड्डण्णवर आदीकडून दीपप्रज्वलन करण्यात आले. मुंबई, दिल्ली, जयपूर, कोलकाता, गोवा व भारतातील इतर भागातून नामवंत फॅशन डिझयनर्सचे स्टॉल्स या प्रदर्शनात पहावयास मिळतील. नावीन्यपूर्ण एथनिक वेअर, कुर्ता, पलाझो, साडय़ा, ड्रेस मटेरिअल, पादत्राणे, बेडशीट, कार्पेट इत्यादींची अनोखी रेंज येथे उपलब्ध आहे. तिसरे रेल्वे गेट येथील नेटीव्ह हॉटेलमध्ये हे प्रदर्शन दि. 16 व 17 मार्च या दोन दिवसांसाठी सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत ग्राहकांसाठी खुले आहे. एक वेगळे नावीन्यपूर्ण प्रदर्शन ग्राहकांना नक्कीच अनुभवता येईल असे फॅशनिस्टाचे संचालक पवन शंकर म्हणाले.
या प्रसंगी कविता हंजी, शर्मिला कोरे, अरुणा शहा, शर्मिला हजारे, अनिता कणबर्गी, स्वाती जोग आदी उपस्थित होते. प्रदर्शनाची शेवटची तारीख 17 मार्च असून बेळगावातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.